मी साहेबां सोबत !

अर्चना घारेंनी स्पष्ट केली भूमिका
Edited by: विनायक गावस
Published on: July 03, 2023 12:30 PM
views 350  views

सावंतवाडी : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी साहेबांसोबत अशा आशयाच्या टोप्या परिधान करत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबतच असल्याच त्यांनी स्पष्ट केले आहे.


राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. आम्ही त्यांच्या हाताखाली काम केले आहे. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबतच राहणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब यांनी दिली आहे. ५ जुलै रोजी पक्षाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुढील रणनीती ठरेल. पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी यापूढेही पक्षाचे काम अधिक जोमाने करेन अस मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले आहे.


याप्रसंगी राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला शहराध्यक्ष अँड. सायली दुभाषी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, दर्शना बाबर-देसाई, हिदायतुल्ला खान, जावेद शेख, राकेश नेवगी, इफ्तेकार राजगुरू आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.