
सावंतवाडी : कोलगाव निरुखेवाडी येथे आयोजित महिला बैठकीमध्ये अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी महिला भगिनींशी संवाद साधत तसेच त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व महिला भगिनींना दीपावलीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लढा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांनी सौ. घारेंना दिला. याबद्दल सर्व महिलांचे अर्चना घारे-परब यांनी आभार मानले.