
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे राष्ट्रवादीचा पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला असून जोरदार शक्तिप्रदर्शन त्यांनी केलं आहे.
अर्चना घारे-परब या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने घारे नाराज असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरून लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे अर्चना घारे-परब आता कोणती भूमिका घेतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर, दिपीका राणे, सेजल राणे, पुंडलिक दळवी, संजय भाईप आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.