आरवली ग्रा.पं.त उपसरपंचपदी ठाकरे शिवसेनेचे किरण पालयेकर

Edited by: दिपेश परब
Published on: June 20, 2023 19:55 PM
views 116  views

 वेंगुर्ला : आरवली ग्रामपंचायत उपसरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे किरण पालेकर विराजमान झाले आहेत. उपसरपंच पदाच्या आज झालेल्या निवड प्रक्रियेत किरण पालयेकर याना ६ मते मिळाली तर शिला जाधव यांना केवळ ३ मतांवर समाधान मानावे लागले.

  आरवली ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज (२० जून)  उपसरपंच पदासाठी निवडणूक लागली होती. यापूर्वी उपसरपंचपदी भाजपच्या रिमा मेस्त्री होत्या. दरम्यान या निवडी नंतर ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी पालेकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपतालुकाप्रमुख सुधाकर राणे, वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, माझी सरपंच सुवर्णा राणे, विलास चिपकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षता नाईक, वैशाली रेडकर, महिला उपतालुका संघटक शितल साळगावकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक, उदय नाईक, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.