पत्रकारांशी अरेरावी भोवली

बाप लेकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल
Edited by: संदीप देसाई
Published on: March 06, 2025 12:16 PM
views 648  views

दोडामार्ग : पत्रकारांशी अरेरावी करणे बाप लेकाला भोवले // पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत दोडामार्गमध्ये अखेर गुन्हा दाखल // तालुका पत्रकार संघटना आक्रमक // अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, खजिजदार रत्नदीप गवस, तेजस देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास देसाई यांसह तालुक्यातील पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर // माटणे येथील बुधवारी सांयकाळची घटना, दोडामार्ग मधील वृत्तांकन करण्यास गेलेल्या तीन पत्रकारांवर अरेरावी करणाऱ्या माटणे येथील विठ्ठल (सूर्या) नाईक व त्याचा मुलगा नवनाथ नाईक यांच्यावर गुन्हा दाखल // आरोपीना तातडीने चौकशी करून अटक करण्याची पत्रकार समितीची मागणी // पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने थेट डीवायएसपी कडून होणार या प्रकरणाचा तपास // जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर यांसह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी दोडामार्ग मध्ये होतायेत दाखल // तालुका कार्यकारिणी, पत्रकार यांचेशी चर्चा करून घेणार पोलिस अधिकाऱ्यांची भेट // दरम्यान ज्या ठिकाणी घटना घडली तेथून महसूलने ८७ ब्रास अवैध मातीचा साठा जप्त //