
चिपळूण : सुप्रसिद्ध निसर्ग अभ्यासक, अरण्य रक्षक आणि साहित्यिक पद्मश्री स्व. मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक आदरांजली सभेचे आयोजन चिपळूणमध्ये करण्यात आले आहे. ही सभा सोमवार, दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता, चिपळूणमधील लोटिस्मा येथील बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य टिळक वाचनालय, ग्लोबल चिपळूण संस्था आणि ऍक्टिव्ह ग्रुप चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
चितमपल्ली यांच्या जीवनकार्याचा आढावा, त्यांचे निसर्ग संवर्धनासाठीचे योगदान आणि त्यांच्या साहित्यिक कार्याचे स्मरण या सभेमध्ये करण्यात येणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अरण्य ऋषीस सामूहिक श्रद्धांजली अर्पण करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.