अ.रा.विद्यालयात नवगतांचे स्वागत ; विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 15, 2024 13:57 PM
views 193  views

वैभववाडी : दोन महिन्यांच्या प्रदिर्घ सुट्टीनंतर अखेर आज शाळेची घंटी घणाणली. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच जोरदार स्वागत करण्यात आले. वैभवववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात इयत्ता पाचवीसह इतर वर्गात नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच  स्वागत करण्यात आलं. या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

 राज्यात आजपासून शाळा सुरु झाल्यात. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेट्स तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुलं देत, त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. प्रदिर्घ सुट्टी नंतर विद्यार्थी व शिक्षक, मित्र -मैत्रिणी यांच्या भेटीमुळे शालेय परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला आहे. या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण‌ तसेच  एक राज्य एक गणवेश, आनंददायी शनिवार अशा योजना शासनामार्फत राबविण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालयात आज विद्यार्थ्याच जल्लोषी स्वागत करण्यात आले. संस्थेचे  कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवीन गणवेश, नवीन शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके यांमुळे विद्यार्थी आनंदी झाले होते.

      यावेळी मुख्याध्यापक बी.एस.नादकर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख  पी.जे.सावंत, माध्यमिक विभाग प्रमुख  एस.एस.पाटील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.