सोनवडे - शिवडाव घाटमार्गाच्या भु - संपादन प्रस्तावाला मंजुरी

निलेश राणेंचा पाठपुरावा
Edited by: प्रसाद पाताडे | भरत केसरकर
Published on: December 14, 2023 19:50 PM
views 668  views

कुडाळ : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटमार्गासाठी आता प्रत्यक्षात हालचाली सुरू झाल्या असून घाट मार्गासाठी खाजगी जमिनी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भातील खाजगी जमीन भु-संपादन प्रस्तावाला मान्यता मिळाली असून आता जमिनी संपादित करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

या नवीन प्रस्तावाच्या मंजुरीमुळे घाटमार्गासाठी लागणारी एकूण ४ की. मी. पेक्षा जास्त जमीन संपादित होणार असून खाजगी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली लागणार आहे. या संदर्भात माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर भाजपा ओरोस मंडल सरचिटणीस नारायण गावडे यांनी सातत्याने भाजपा नेते निलेश राणे यांच्या जवळ पाठपुरावा केला होता. या भु संपादनानंतर या घाट रस्त्याची निविदा काढली जाणार असून एकूण ५०० कोटी रुपये या घाट मार्गासाठी खर्ची होणार आहेत.