परुळेबाजार ग्रामपंचायतीचं राज्यस्तरीय समितीकडून कौतुक

कचरा संकलन, गांडुळ खत, शौचालये, पाणी स्त्रोत, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प ठरले लक्षवेधी
Edited by: दीपेश परब
Published on: October 19, 2022 13:12 PM
views 382  views

वेंगुर्ला : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत वेंगुर्ला  तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीने भेट देऊन ग्राम तपासणी व पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पर्धेत कोकण विभागात द्वितीय आलेल्या परुळेबाजार ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीने भेट देऊन पाहणी करून अभियानांतर्गत कामाचे मुल्यमापन केले. या समितीत पाणीपुरवठा व स्वच्छता तथा अध्यक्ष राज्यस्तरीय समिती मंत्रालय अव्वर सचिव चंद्रकांत मोरे, कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे व रमेश पात्रे यांचा समावेश होता. समितीचे स्वागत सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच मनिषा

नेवाळकर यांच्यासाहित सर्व ग्रा.पं. सदस्य सर्व यांनी केले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, स्वच्छता विभाग सिंधुदुर्गचे श्री मठकर, विस्तार अधिकारी संदेश परब, माजी सरपंच प्रदिप प्रभु, पुरुषोतम प्रभु, प्राजक्ता चिपकर, प्रणिती आंबडपालकर, ग्रा. पं. सदस्य सुनिल चव्हाण, शांताराम पेडणेकर, अदिती परुळेकर, प्रणिता तांडेल,ग्रामसेवक शरद शिंदे, ग्रामसेवक मंगेश नाईक, स्वच्छता विभाग. पं.स.च्या अक्षता नाईक, निर्मला परब, प्रसाद पाटकर, उमेश नेवाळकर सुधीर पेडणेकर, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींसह महीला ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी समितीने अभियानांतर्गत केलेल्या कामांची व उपक्रमांची पाहणी केली यात कचरा संकलन प्रक्रिया, गांडुळ खत प्रकल्प, वैयक्तीक सार्वजनीक शौचालये, पाणी स्त्रोत, समाजमंदिर सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प यांची पाहणी केली. तर ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.