
देवगड : देवगड साळशी येथील केंद्र शाळा साळशी नं. १ याप्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी केंद्र शाळा साळशी याप्रशालेतील सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या, तसेच गणित व इंग्लिश विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये रुपल प्रभाकर साळसकर ( इ.सातवी, प्रथम क्रमांक व गणित विषयात प्रथम क्रमांक ) तसेच जान्हवी प्रशांत गावकर( इंग्रजी व गणित विषयात प्रथम क्रमांक), वैभवी विजय शंकरदास ( इ.सहावीमध्ये प्रथम क्रमांक, गणित व इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक), आर्या निलेश गावकर ( इ.पाचवीमध्ये प्रथम क्रमांक, इंग्रजी व गणित विषयात प्रथम क्रमांक) यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
ही बक्षिसे यशवंत आप्पाशेठ माळवदे यांजकडून (आई लक्ष्मीबाई आपाशेठ माळवदे यांच्यास्मरणार्थ), श्रीम.पदमावती पुरुषोत्तम पालयेकर यांजकडून ( वडील आत्माराम व काका लक्ष्मण देवू साळसकर यांच्यास्मरणार्थ ), तसेच अँड. बी.एस. गावकर या शिक्षणप्रेमीनी या प्रशालेला दिलेल्या कायम स्वरुपी ठेव रक्कमेेतून रोख पारितोषिके देण्यात आली.
तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्याना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच पालकांसाठी घेण्यात आलेल्या आजी- आजोबा उपक्रम, महिलांसाठी पाककला व संगीत खुर्ची स्पर्धातील विजेत्यांनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली सुतार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष साळसकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सत्कार सोहळ्यास सरपंच वैशाली सुतार उपसरपंच कैलास गावकर, ग्रामपंचायत सदस्य वैभव साळसकर, विशाखा साळसकर, आदिती रावले, कविता साळसकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष साळसकर, उपाध्यक्ष त्रिशा गावकर, श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशीचे चेअरमन योगेश मिराशी, माजी सरपंच किशोर साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, जगन्नाथ मिराशी, विजय घाडी, जगदीश सावंत,पोलिस पाटील कामिनी नाईक, प्राथमिक शिक्षक समितीचे देवगड शाखेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण, बापू खरात, मुख्याध्यापक गंगाधर कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलत्ता जाधव यांनी केले. प्रास्ताविक व आभार गंगाधर कदम यांनी मानले. यानंतर मुलांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.