सावंतवाडी तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती...!

Edited by: भगवान शेलटे
Published on: June 13, 2023 11:39 AM
views 287  views

सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी यापूर्वी प्रभारी तहसीलदार म्हणून काम पाहिलं होत. यापूर्वी अरुण उंडे हे ६ महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीकरिता सावंतवाडी इथं कार्यरत होते. 

श्रीधर पाटील हे कार्यक्षम अधिकारी म्हणून पाहिलं जात. सर्वसामान्यांची कामे जलद गतीने होण्यावर नेहमी त्यांचा भर असतो. त्यांच्या नेमणूकीने सर्वसामन्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.