कॉंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी मीनाताई बोडके यांची नियुक्ती

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 14, 2023 20:06 PM
views 114  views

वैभववाडी : वैभववाडीच्या माजी सभापती मीनाताई नामदेव बोडके यांची राष्ट्रीय  काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सचिवपदी निवड झाली आहे. कॉंग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे संपर्कमंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या शिफारसने ही नियुक्ती केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी त्यांना दिले.

    काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचवून अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी, राहुलजी गांधी यांना अभिप्रेत असलेले कार्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्तारासाठी करीत असलेल्या कामाची दखल घेत त्यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

     मीनाताई बोडके यांनी वैभववाडीचे उपसभापती व काही काळ सभापती पदी भूषविले आहे. माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असतानाही त्या राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. सेवानिवृत्तीनंतर महिला तालुकाध्यक्ष पदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली. कॉंग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत.

    ओरोस येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत कॉंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती केल्याचे पत्र पक्ष प्रभारी शशांक बावचकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विकास सावंत, साईनाथ चव्हाण, विलास गावडे आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.