
कणकवली : वरवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी महेश लक्ष्मण कदम यांची निवड करण्यात आली आहे. वरवडे ग्रामपंचायतची ग्रामसभा आज सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सोनू सावंत यांच्यासह सर्वच ग्रामस्थांनी महेश कदम यांचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित सरपंच, उसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजप उप तालुका अध्यक्ष सोनू सावंत, अमोल बोंद्रे, प्रदीप घाडी, प्रमोद गावडे, विशाल कासले, विजय कदम, संतोष कदम,राजू बांदल,प्रनील बांदल, सचिन घाडीगांवकर, बाला मेस्त्री,विशाल वरवडेकर, सिद्धार्थ वरवडेकर, केतन घाडीगांवकर, इरफान खोत्, सलाउद्दिन कुडाळकर, आजिम कुडाळकर, दशरथ घाडीगांवकर, निलेश सावंत, हनुमंत बोंद्रे आणि गावातील बहुसंख्य ग्रामस्थ आणि सोनू सावंत मित्रमंडळ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.