कुडाळ महिला रुग्णालयात दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांची तत्परता
Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 12, 2024 12:50 PM
views 1211  views

कुडाळ : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या. मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी तत्काळ स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार डॉ. स्वप्नाली माने या दर मंगळवार, गुरुवार, शनिवार व पहिला व तिसरा रविवार या दिवशी कुडाळ महिला रुग्णालय येथे उपस्थित असतील तर डॉ. पद्मजा कुंभारवाड या दर सोमवार, बुधवार, शुक्रवार व दुसरा व चौथा रविवार या दिवशी कुडाळ महिला व बाळ रुग्णालय येथे उपस्थित राहून महिलांना सेवा देतील.

आमदार झाल्यानंतर महिलांचा प्राधान्याने विचार करत महिलांसाठी स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे महिला वर्गाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.