सावंतवाडी तहसीलदारपदी अरुण विलास उंडे यांची नियुक्ती

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात होते कार्यरत | 6 महिन्यांसाठी सांभाळणार कार्यभार
Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2022 19:06 PM
views 346  views

सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदारपदी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी अरुण विलास उंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांसाठी ते प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून कार्यभार पाहणार आहेत. आज सावंतवाडी तहसीलदार पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे. उंडे हे मूळ उस्मानाबाद येथील आहेत. तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यानंतर सावंतवाडीत प्रभारी तहसीलदार म्हणून श्रीधर पाटील यांनी गेले सात महिने काम पाहिले होते.