
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या मंगळवार दि. ३० व बुधवार दि. ३१ जुलै रोजी समुपदेशन बदली प्रक्रिया होत आहे. एक ते तीन टप्प्यातील शिक्षकांच्या उद्या मंगळवारी तर तीन व चार टप्प्यातील शिक्षकांच्या बुधवारी समुपदेशन पद्धतीने बदल्या पार पडत आहेत. या पाच टप्प्यातील ९६० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहे. जिल्हा बाहेर बदलून झाल्या असल्या आंतरजिल्हा बदलीसाठी १४७ प्रस्ताव होते मात्र त्यातील १०७ शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीस होकार दिल्यामुळे या बदल्या होणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.