पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 30, 2022 16:28 PM
views 264  views

सिंधुदुर्गनगरी : पोलीस भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी होता यावे, या दृष्टीकोनातून पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज सादर करावयाची मुदत दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.

पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार आवेदनपत्रे स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. ३० नोव्हेंबर २०२२ निश्चित करण्यात आली होती. ती आता १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.