पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 04, 2023 11:09 AM
views 433  views

मालवण : किल्ले राजकोट येथे उभारणी करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण आणि तारकर्ली येथील नौसेना दिन सोहळा यात सहभागी होण्यासाठी भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे हॅलीकॉप्टरने दाखल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी टोपीवाला बोर्डिंग मैदान येथील जय गणेश इंग्लिश स्कूल येथून नियोजित कार्यक्रम स्थळी जाणार आहेत. तरी पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. दुपारी 1 वाजेपर्यंत मामा वरेरकर नाट्यगृहाच्या शेजारील मार्गाने तसेच भरड या मार्गे सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भाजप व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.