
मालवण : वायरी येथील महेश प्रमोद मातोंडकर (२८) या युवकाची मेंदूच्या रक्तस्रावामुळे प्रकृती गंभीर असून त्याचा जीव वाचविण्यासाठी उपचाराची आवश्यकता आहे. सध्या महेश याच्यावर मुंबईतील सोमय्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या संपूर्ण उपचारासाठी पंधरा लाख रूपयांची आवश्यकता आहे. मातोंडकर यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने मातोंडकर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. यामुळे महेश याच्या उपचारासाठी दाते, सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन मातृत्व आधार फाऊंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.
वायरी भूतनाथ येथील माणगावकर काजू फॅक्टरीनजीकचे रहिवासी असलेले प्रमोद मातोंडकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी प्रमोद मातोंडकर यांची पत्नी प्रियांका मातोंडकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. या घटनेला वर्षही लोटले नसताना त्यांचा मोठा मुलगा महेश हा कामानिमित्त मुंबईत आहे. नुकताच त्याचा विवाह झाला असून घर सावरणारा महेश हा ब्रेनस्ट्रोक येऊन बाथरूममध्ये पडला. लागलीच त्याला मुंबई येथील
सोमय्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून तो बेशुद्ध अवस्थेत आहे. डॉक्टरांनी संपूर्ण उपचारासाठी १५ लाख रु. खर्च सांगितला आहे. महेश याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्याच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. त्याच्यावर उपचार सुरूच आहेत. मातोंडकर कुटुंबाची परिस्थिती गरिबीची आहे. यामुळे दानशूर व्यक्तींनी महेश याच्या उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहन कुटुंबियांनीही केले आहे. सदर मदत रक्कम मातृत्व आधारकडे जमा होणार आहे. महेश मातोंडकर याला आर्थिक मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बैंक, शाखा तारकर्ली, ता. मालवण, खाते क्रमांक ०६१४०००००००५२३७, आयएफएस नंबर SIDC०००१०६१ (संपर्क- ९४०४३९६१८२)