राऊतांची नको जनतेची माफी मागा | निलेश राणेंचा वैभव नाईकांना टोला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 18, 2024 14:06 PM
views 228  views

मालवण : वैभव नाईकांनी विनायक राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असती तर बरं झालं असतं. मागच्या दहा वर्षात या दोघींनी लोकहिताची कामं केली असती तर जनतेने त्यांना हे दिवस दाखवले नसते असा टोला भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी लगावला आहे. 

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव झाल्यानंतर मालवण येथील मेळाव्यात आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली होती. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात अपेक्षित मताधिक्य पक्षाला मिळाले नव्हते. या मतदार संघात नारायण राणे यांना 27 हजारहून अधिकचे लीड मिळाले होते. विनायक राऊत यांना मताधिक्य न मिळाल्याने आमदार वैभव नाईक यांनी माफी मागितली होती. 

नाईक यांच्या या माफीनाम्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी एक्स अकाउंटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे, आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली आहे. कारण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या फरकाने विनायक राऊत हे मागे पडले.

वैभव नाईकांनी विनायक राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असती तर बरं झालं असतं. मागच्या दहा वर्षात या दोघींनी लोकहिताची कामं केली असती तर जनतेने त्यांना हे दिवस दाखवले नसते असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.