पिकुळेत आपा गवस यांचं पारड जड | प्रचाराला मिळतोय मोठा प्रतिसाद

विवेकानंद नाईक, तिलकांचन गवस व संदीप गवस यांची खंबीर साथ
Edited by: संदीप देसाई
Published on: December 16, 2022 17:33 PM
views 185  views

दोडामार्ग : सर्वांचे लक्ष लागलेल्या पिकुळेत ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आपा गवस यांनी आघाडी घेतल्याने विरोधी उमेदवरांची हवा टाईट झाली असून गावकरी व मतदार यांचेकडून मिळत असलेला प्रतिसाद पहाता आपा गवसच पुढचे सरपंच आहेत, असा ठाम विश्वास तिलकांचन गवस व संदीप गावस यांनी व्यक्त केलाय.    

  एक युवा, अनुभवी आणि 24 तास संपर्कात असणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांच्या प्रचाराला गावातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

त्यांना गावचे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक , बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी तथा कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक तिलकांचन गवस व संदीप गवस यांची खंबीर साथ असल्याने आपा गवस यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आपा गवस यांच्या समर्थकात उत्साही वातावरण आहे. पिकुळे गावांतच दोडामार्ग तालुक्यात थेट सरपंच पदासाठी सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात उपसरपंच तथा आताचे शिंदे गटाचे उमेदवार आपा गवस, ज्यांनी मागील निवडणुकीत पिकुळे प्रभाग 2 मधून 330 पैकी विक्रमी 310 मते मिळवीत एक रेकॉर्ड केले होते. आणि ग्रामपंचायत मध्ये निवडून आल्यानंतरही त्यांनी उपसरपंच म्हणूनही यशस्वी धुरा सांभाळली. अशा अनुभवी आणि त्याही पेक्षा रात्री अपरात्री गरजवंताच्या मदतीला धावून जाणाऱ्या युवकांला थेट सरपंच पदाच्या निवडणूक मध्ये गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

  म्हणूनच आपण थेट सरपंच पदी विराजमान झाल्यावर गावासाठी पहिलं काम जे करणार आहे ते म्हणजे 24 तास पाणी पुरवठा, आणि दुसरं काम शेतकऱ्यांना शेतीसाठी तिलारीचं पाणी या दोन कामाना आपलं प्रथम प्राधान्य राहणार आहे. कोणतीही आश्वासाने न देता गावचा सर्वांगीण व शाश्वत  विकास हेच आपलं स्वप्न आहे. आणि ते साकार करण्यासाठी आज राज्यात कॅबिनेट मंत्री असलेले आपल्या भागाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आपण कटीबद्ध रहाणार आहे. गावचे धडाडीचे कार्यकर्ते व आमचे मार्गदर्शक तिलकांचन गवस, संदीप गवस, विवेकानंद नाईक, ज्ञानेश्वर नाईक, जयवंत गवस, सातू जाधव यांसह सर्व थोरा मोठ्याच्या मार्गदर्शनाखाली पिकुळे गाव सर्वांग सुंदर बनविण्याचे आपले प्रयत्न राहणार आहेत.म्ह्णूनच आपल्याला सामान्य जनता आणि गावकरी यांनी खंबीर साथ दिल्याने आमचा विजय पक्का असल्याचा विश्वास आपा गवस यांनी व्यक्त केलाय.