
कणकवली : कणकवली तालुका भाजपा ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी ही निवड जाहीर केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते या निवडीचे नियुक्तीपत्र अनुप वारंग यांना देण्यात आले.
यावेळी मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, प्रकाश सावंत, सोनू सावंत, सर्वेश दळवी, स्वप्निल चिंदरकर, पंढरी वायंगणकर, समीर प्रभूगावकर, संदिप सावंत, सचिन पारधीये, दिनेश गोठणकर, प्रज्वल वर्दम, आबा कोरगावकर, परेश कांबळी, गणेश तळगावकर, बाबू नारकर, नितीन पवार, सचिन खोचरे, सुहास राणे, अमोल रासम, अभय गावकर, स्वरुप कोरगावकर आदी उपस्थित होते.










