
सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठक सभागृहात देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.