
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तसेच सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने अमली पदार्थाचा दुरूपयोग आणि अवैध तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन दि. २६.०६.२०२४ रोजी ज्ञानकुंज कॉलेज ओरोस येथे करणेत आले. अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे एस. डी. गिरकर,सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. एस. एस. खुने, सखी वन स्टॉप सेंटरच्या अॅड. रुपाली प्रभू,लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग श्रीम. श्वेता सावंत,
ज्ञानकुंज कॉलेज, ओरोसच्या प्राचार्या श्रीम. मानसपुरे आदी उपस्थित होते. अॅड. रुपाली प्रभू, सखी वन स्टॉप सेंटर, यांनी अमली पदार्थांचा दुरूपयोग याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. अमली पदार्थांचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम यांची माहिती दिली. तसेच अॅड. एस. एस. खुने, सहाय्यक लोक अभिरक्षक यांनी विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत दिले जाणाऱ्या सेवा व सहाय्य याबाबत माहिती दिली.