चिन्मयप्रसाद बोटीवर हल्ला प्रकरण ! ; आरोपींना अटकपूर्व जामीन

Edited by: ब्युरो
Published on: November 29, 2023 15:11 PM
views 387  views

सिंधुदुर्ग : चिन्मयप्रसाद बोटीवर झालेल्या हल्ला प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. धनंजय सिताराम राऊळ, रत्नखचित आत्माराम आडकर, भरत राजाराग कोचरेकर, संजय चंद्रकांत केळुसकर तसेच अमोल निलेश पराडकर, सोहम  संजय केळुसकर त ललित महादेव देऊलकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात यात अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा म्हणून दोन वेगवेगळे अर्ज दाखल केलेले होते. सदरचे अर्ज काही शर्ती त अटींवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका साहेब यांनी मंजूर केले. अर्जदार तर्फे अँड. अजित उर्फ एस. एन. भणगे, अँड. मिहीर भणगे, अँड. केणी, अँड. स्वप्ना सामंत, अँड. सुनिल मालवणकर, अँड. आशुतोष कुळकर्णी व अँड. तेजाली भणगे यांनी काम पाहिले.


यातील हकीगत अशी की, फिर्यादी कृष्णनाथ भगवान तांडेल, रा. सर्जेकोट, मालवण यांनी अशी फिर्याद दिली की, त्यांनी सुनिल धोंडू मयेकर यांचा 'चिन्मयप्रसाद ' नावाचा ट्रोलर भाडेतत्वावर घेतलेला होता. त्या बोटीवर शंकर आप्पा केरळी हे तांडेल म्हणून कार्यरत होते, तसेच एकूण २२ खलाशी ठेवलेले होते. उपरोक्‍त ट्रोलरवर दोन जीपीएस, एक फिश  फायंडर, दोन वायरलेस , एक हायड्रॉलिक बींच अशी  यंत्रणा बसवलेली  होती. तसेच त्यावर २५ लाख किंमतीचे मासेमारी पर्सनेटची सुविधा होती. सदरचा ट्रॉलर दिनांक २८.१०.२०२३ दोजी ४२० लिटर डिझेल, त्यांचे जेवणखाण व रु.५ ,२५, ००० /-  रोख अशी रक्‍कम घेऊन २३ खलाश्यासहित मासेमारी कारीता समुद्रात  घेऊन गेलेले होते.

दिनांक २९.१०.२०२३ रोजी कृष्णा मेघःशाम कांदळगावकर व. ११ लोकांनी ज्यांची नावे फिर्यादीत नमूद केलेली आहेत] व इतर १३ ते १५ जणांनी सदरील  बोटीवर हल्ला करुन खलाशी सुजय आडीवरेकर, जयदास ढोर्लेकर , विनय होरो व गँब्रीयळ लाकरा यांना दांडे, लोखंडी रॉड व चाकू आशा साहित्याने मारझोड करुन जखमी केले  तसेच बोटीवरील  वस्तूची नासधुस करुन डिझेलचे पिंप फोडले, अशी हकीगत उपरोक्त ट्रॉलरवरील  तांडेल शंकर आप्पा केरळी यांनी त्यांना दिली.

वरील फिर्यादीनुसार मालवण पोलीसांनी फिर्यादीत ११ नावे नमूद असलेल्या व इतर नावे माहिती नसलेल्या १५ जणांविरुध्द भा. द. वि. कलम ३२७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ४२७, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल  केला. वरील गुन्ह्यानुसार धनंजय सिताराम  राऊळ, रत्नखचित आत्माराम आडकर, भरत राजाराम कोचरेकर, संजय चंद्रकांत केळुसकर तरोच अमोल  निलेश पराडकर, सोहग संजय केळुसकर व ललित महादेव देऊलकर यांनी आपणास अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून गे. सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले. 


आरोपीत संजय चंद्रकांत केळूसकर याचे असे म्हणणे  की, सदर तथाकथित घटनेच्या वेळी तो गोवा येथे देवळात होता व  तसे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. धनंजय राऊळ, रत्नखचित आडकर व भरत कोचरेकर

हे तथाकथित घटनेच्या वेळी तहसिलदार, मालवण यांच्याबरोबर बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी पंचनाम्यासाठी हजर होते. इतरांची नावे जी फीर्यादीत नाहीत त्यांना विनाकारण गोवविण्यात आलेले  आहे. सरकारी पक्ष व आरोपीत यांच्यातर्फेचा युक्‍तीवाद ऐकून मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश  श्री. एस. जे. भारुका साहेब यांनी वरील  आसमींना अटक झाल्यास त्यांची १५०००/- रुपयांच्या जामीनावर व दिनांक ३०.११.९०२३ रोजी पोलीस ठाणे, मालवण येथे हजेरी लावण्याच्या तसेच तपासी अंमलदार तपासकामी ज्यावेळी बोलावतील त्यावेळी हजर रहाण्याच्या अटीवर दोन्ही अर्ज मंजूर केले . आरोपीत यांच्यातर्फे अँड. अजित उर्फ एस. एन. भणगे, अँड. मिहीर भणगे, अँड. केणी, अँड. स्वप्ना सामंत, अँड. सुनिल  माळवणकर, अँड. आशुतोष कुळकर्णी व अँड. तेजाळी भणगे यांनी काम पाहिले.