क्षयरोग मुक्त गाव म्हणून अणसुर ग्रामपंचायतचा सन्मान

जिल्हा व तालुकास्तरावर ग्रामपंचायतला रौप्य पदक
Edited by: दिपेश परब
Published on: April 08, 2025 17:46 PM
views 137  views

वेंगुर्ला : क्षयरोग मुक्त गाव म्हणून जिल्हा स्तरावर रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल अणसुर ग्रामपंचायतचा वेंगुर्ला गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

  क्षयरोग मुक्त गाव म्हणुन अणसूर गावची पहिल्यांदा तालुका आणि आता जिल्हास्तरावर अशी दोन वेळा निवड झाली. पुरस्कार वितरण वेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, आरोग्य विभागाच्या डॉ. धुरी, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी ग्रामअधिकारी श्रीम. सातोसे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर आदी उपस्थित होते.

गावातील आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ यांनी या पुरस्कारासाठी खरी मेहेनत घेतली तसेच ग्रामस्थांन मार्गदर्शन करणे  त्यांच्या मनातील आजार विषयक गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले असे गौरवोद्गार सरपंच सत्यविजय गावडे यांनी काढले.