
वेंगुर्ला : तालुक्यातील अणसूर पाल हायस्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा २८ डिसेंबर रोजी अणसूर पाल हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी अणसूर ग्रामपंचायत च्या वतीने कला क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल तसेच विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी हायस्कूलच्या शिक्षकांचाही सन्मानचिन्, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, सीमा गावडे, संयमी गावडे, सुधाकर गावडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गावडे, प्रकाश गावडे, सुनील गावडे, भास्कर शंभु गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी विध्यर्थ्याना मोलाचे मार्गदर्शन करुन सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमात शासकीय सारथी शिष्यवृत्ती योजना पारितोषिक प्राप्त विद्यार्थी मिलन किशोर सावंत, धनश्री तुकाराम परब, हर्षदा सुनील गावडे, संतोष उत्तम नाईक, साहिल सुनील गावडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासन आयोजित कला उत्सव स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम व राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संतोष उत्तम नाईक याचा सन्मान करण्यात आला.
वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात (इ.९ वी ते इ. १२ वी ) विद्यार्थी साहिल दिपक गावडे याच्या अल्पखर्चिक सुक्ष्मदर्शक- प्लास्टोस्कोप विज्ञान प्रतिकृतीने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर त्याला जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेता आला याबद्दल त्याचाही सन्मान करण्यात आला. तर वेंगुर्ला तालुका विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थी प्राथमिक गट( इ.६वी ते इ.८वी) निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व विज्ञान प्रतिकृती सोहम संजय अणसूरकर, प्रश्नमंजुषा स्पर्धा सोहम संजय अणसूरकर व समिक्षा शामसुंदर गावडे, माध्यमिक गट( इ.९वी ते इ.१२वी) निबंध स्पर्धा धनश्री सुनील गावडे, वक्तृत्व स्पर्धा साहिल दिपक गावडे व प्रश्नमंजुषा स्पर्धा साहिल सुनील गावडे व श्रीयश दिलीप मालवणकर यांचाही सन्मान करण्यात आला.