वेंगुर्ल्यात ऑनलाईन फसवणूकीचा आणखी एक बळी

२६ लाख घालविले
Edited by: दिपेश परब
Published on: February 13, 2025 20:54 PM
views 627  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील वडखोल येथील रहिवासी आणी सध्या रा. सांताक्रुझ - मुंबई येथील सावंत नामक कर्मचाऱ्याची २६ लाख ३६ हजार ५९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक ची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडखोल येथील रहिवासी महेंद्र सावंत हे अक्मे पेक्स अँड प्रिंट प्रा. लि.या प्रेस कंपनी मध्ये  ग्राफिक्स डिझायनर आहेत. त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिमध्ये असे म्हटले आहे की, २७ सप्टेंबर २०२४ रोजी १२.५३ वा. ते  दि. ७ डिसेंबर २०२४ रोजी १२.२५ वा.च्या सुमारास वेंगुर्ले वडखोल येथे श्रद्धा बेलानी मो. नं. ८१०९०५१३७५ व अभिषेक रामजी मो. नं ८१०९३२८६३२ यांनी ARES Capital या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून ८१६ Ares 1vs1 Investment Group व्हाट्सअप ग्रुपला ऍड करून त्यावर शेअर मार्केट गुंतवणूकिबाबत माहिती सांगितली.

तसेच आपल्याला विविध IFSC कोडसह बँक अकाउंट देऊन त्यावर रक्कम २६,३६,०५९ रुपये ऑनलाईन तसेच IMPS, RTGS व NEFT पद्धतीने भरणा करण्यास लावून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या दाखल फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात बी एन एस ३१८ (४), आयटी ऍक्ट ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे करीत आहेत.