माणगाव हायस्कूलमधील आगळावेगळा शिक्षक दिन..!

Edited by: भरत केसरकर
Published on: February 12, 2024 14:20 PM
views 49  views

कुडाळ : माणगाव हायस्कूलमध्ये एक आगळावेगळा शिक्षक दिन साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होत असताना या हायस्कूलमध्ये 11 फेब्रुवारी शिक्षक दिन साजरा होतो. याचं कारण पण वेगळं आहे.  हया हायस्कूलचे प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांचा स्मृतिदिन म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो.

सह्याद्रीच्या कुशीत असलेला कुडाळ तालुक्यातील श्रीवासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयात  पाचवी ते बारावीपर्यंत शाळा आहेत.या प्रशालेचे पहिले मुख्याध्यापक कै. मोहनराव रांगणेकर यांचा 11 फेब्रुवारी हा स्मृतिदिन.  या भागात शालेय शिक्षणाची फार वर्षा पूर्वी सोय नव्हती.  त्यावेळी त्यांनी येथे शैक्षणिक सुविधा सुरू करून दिल्या. स्वतःला शिक्षणात झोकून देत असताना स्वताच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल.  11 फेब्रुवारीला त्यांच निधन झालं.  त्यामुळे त्यांचा स्मृतिदिन म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो.

या दिवशी पाचवी ते 12 वी पर्यंत संपूर्ण शाळा ही विद्यार्थी शिक्षक बनून चालवत असतात.  यामध्ये काही विद्यार्थी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रंथपाल, लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक,शिपाई अशा विविध भूमिकेत असतात तर नेहमी अध्यापन करणारे प्रशिक्षक हे निरीक्षकाच्या भूमिकेत असतात.....

खर तर हा शिक्षक दिन साजरा होण्याचे कारण वेगळच आहे. माणगाव खोऱ्यातील 36 गावाला जोडणारे गाव म्हणजे माणगाव. या भागात स्वातंत्र्यानंतर आठवी ते बारावी पर्यंत शिक्षणाची सोय नव्हती. अशावेळी कैलासवासी मोहनराव रानेकर सरांनी 1952 मध्ये माणगाव येथे युनियन इंग्लिश स्कूल नावाने एका घरात शाळा सुरू केली. येथे पहिला आठवी चा वर्ग सुरू केला. यानंतर नववी आणि दहावीचे वर्ग सुरू केले.

ही शाळा सुरू होण्यापूर्वी या भागातील मुलांना त्याकाळी म्हणजे १९५० सालात सावंतवाडी,कुडाळ,वेंगुर्ला सारख्या शहरात शिक्षणासाठी जावा लागत होते.  त्यामुळे येथे कोणीही उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जात नव्हता. कारण राहण्याची सोय शहरांमध्ये होत नव्हती. ही शाळा सुरू केल्यानंतर सरांनी आपल्या पत्नीला पण अध्यापनाचे काम दिले. त्यानंतर माणगाव येथे काही दानशूर लोकांनी 14 ते 15 एकर जमीन मोफत दान दिली.यानंतर 1959 साली शाळेची नविन इमारत  बांधली. त्यानंतर प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे नाव या शाळेला देण्यात आले. शाळेत अध्यापनाचे काम सुरू असताना सरांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. आणि 11 फेब्रुवारी 1971 रोजी कै.रांगणेकर सरांचे निधन झालं.यानंतर त्यांचा हा स्मृती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी व इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना रागणेकर सर हे शिस्तीबाबत ते फार कडक होते.सरांचे आज विद्यार्थी संपूर्ण देशभरात आणी जगभरात विविध क्षेत्रात काम करत आहेत. आज या शाळेचे छोटे रोपटे मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत झालेले पाहायला मिळत आहे. सुमारे 62 वर्षापेक्षा जास्त काळ होवून आज पाचवी ते बारावी पर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी शिक्षण घेत असताना मराठी, हिंदी,इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास,भूगोल या सगळे विषय विद्यार्थी शिक्षक म्हणून शिकवत असतात. तर यामधला एक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक असतो. अशावेळी शिक्षक केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत असतात.हा आगळा वेगळा शिक्षक दिन गेली ५५ वर्षे साजरा होत आहे. शिक्षक दिनाची ही परंपरा गेली पन्नास ते पंचावन्न वर्षे येथील शाळा आणी विद्यार्थी जपत आहेत.