
सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. संतोष नार्वेकर हे सांगेलीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते. त्यांच्या या पक्षबदलामुळे सांगेली परिसरात सेनेची ताकद निश्चितच वाढली असून हा भाजपसाठी एक धक्का मानला जात आहे.
यावेळी बोलताना श्री. नार्वेकर यांनी, "शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत," असे स्पष्ट केले.यावेळी वामन नार्वेकर, सचिन नार्वेकर किरण नार्वेकर शेखर नार्वेकर उषा नार्वेकर, सुनिता नार्वेकर, रेखा नार्वेकर, राजश्री नार्वेकर, सुप्रिया नार्वेकर राजेश्वरी नार्वेकर, भारती नार्वेकर, प्रज्ञेश गावडे, पार्वती गावडे, अमित गावडे, संदीप राऊळ, ज्योती सांगेलकर, सुशांत मठकर, सुचित मठकर, नामदेव राऊळ, आनंद परब, ऋषिकेश सावंत, सिद्धेश सावंत, कार्तिक रेडीज, ज्ञानेश्वर सावंत, सखाराम गावडे, संतोष सावंत, अमोल सांगेलकर, दशरथ सांगेलकर, आर्यन राऊळ, संतोष राऊळ, मनोहर सांगेलकर, उमेश राऊळ, नितीन राऊळ, महालक्ष्मी सांगेलकर, हितेश सांगेलकर, सावित्री सांगेलकर, विलास पारधी आदी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवधनुष्य हाती घेतला. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी श्री. नार्वेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, युवा तालुकाप्रमुख क्लॅटस फर्नांडीस, आशिष झाटये,सचिव परीक्षित मांजरेकर, सचिन साटेलकर, जीवन लाड, पंढरीनाथ राऊळ,अंकुश परब, अभय किनळोस्कर, दीपक सांगेलकर, प्रकाश सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










