नारायण विद्यामंदिर आसोली नं. १ चं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Edited by:
Published on: January 27, 2025 20:09 PM
views 250  views

सावंतवाडी : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीम. संपदा साईनाथ नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू रेडकर, आजोबा चीपकर  ( सोनसुरे ), बाळा जाधव (सरपंच आसोली ), निलेश पोळजी (पो. पाटील ), संतोष तळवणकर ( राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ), जिल्हा सचिव रामचंद्र कुडाळकर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, अशोक बोलके, उदय  धुरी, विजय धुरी, श्री संकेत धुरी  ( उपसरपंच आसोली ) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच मुलांनी विविध कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांच्या कलागुणांचे तोंड भरून कौतुक केले. शाळेचा प्रगतिशील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.