
दोडामार्ग : समाजसेवा हायस्कूल इथं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व शिक्षकांचे कोतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. पी. देसाई यांनी वर्षेभरात ज्या विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धामध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले त्यांचे कौतुक केले. तसेच शाळेचे सह शिक्षक तारी सर यांच्या पुढाकाराने दानशूर व्यक्तींनी केलेल्या आर्थिक मदतीतून शाळेची रंगरंगोटी केली त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पांगुळ यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व पालक, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थितीत होते.