आजगावच्या श्री देव अग्निवेताळ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी!

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 31, 2023 19:10 PM
views 213  views

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील जागृत देवस्थान असलेले तथा नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले श्री देव अग्निवेताळ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.

यावेळी देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यात सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी, दुपारी एक वाजता आरती, महागाऱ्हाणे तसेच महाप्रसाद कार्यक्रम होणार असून  संध्याकाळी चार वाजल्यापासून केळी ठेवणे, ओट्या भरणे असे अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत.

रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पालखी प्रदक्षिणा व फटाक्यांची आतिषबाजी होणार असून त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.

 तरी आजगाव दशक्रोशीतील सर्व भाविकांनी आणि भक्तगणांनी या जत्रोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दिवाकर कृष्णा पांढरे, सचिव प्रमोद गोपाळ पांढरे, खजिनदार विष्णू सहदेव पांढरे व श्री देव अग्निवेताळ देवस्थान कमिटीने केले आहे.