फणसवडे ग्रामदैवत मल्लनाथचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

Edited by:
Published on: January 05, 2025 11:24 AM
views 48  views

सावंतवाडी : फणसवडे ग्रामदैवत श्री देव मल्लनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवार दि. ६ जानेवारी रोजी होणार आहे. हे अति दुर्गमस्थान असूनही हजारो भाविक या दिवशी मल्लनाथ चरणी मस्तक होतात. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर नवस बोलणे-फेडणे, माया देवीची ओटी भरणे, नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री सवाद्य पालखी सोहळ्यानंतर जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे (आरोस-दांडेली) नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  ग्रामस्थांनी केले आहे.