केरवाडी श्री देवी माऊलीचा ६ रोजी वार्षिक जत्रोत्सव

Edited by: दिपेश परब
Published on: December 05, 2023 18:44 PM
views 152  views

वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव ०६ डिसेंबर २०२३ रोजी होत असून यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम सादर होणार आहेत. 

दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता देवीची विधिवत पूजा दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री १० वाजता वारकरी संप्रदाय यांच्या भजनाचा कार्यक्रम, रात्री १२  वाजता देवीची पालखी प्रदक्षिणा,  रात्री १ वाजता फटाक्यांची आतषबाजी व रात्री २ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचानाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमिटी, मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.