
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता काळंबा (कालिका) देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री देवीची विधीवत पूजा, ओटी भरणे, नवस बोलणे - फेडणे, अखंड दर्शन सोहळा, रात्री ११ वाजता तरंगांसह पालखी सोहळा, त्यानंतर आजगावकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिगस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.