बाल शिवाजी स्कूलचे शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलन

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 20, 2023 17:45 PM
views 179  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन 22 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे. वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून युवराज लखमराजे भोंसले उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, संस्थेच्या संचालिका सौ. सुलेखा राणे, खजिनदार श्री. रमेश राणे, सौ. तृप्ती देशमुख, डॉ. मानसी राणे या वार्षिक स्नेहसंमेलनाला सर्व उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करावा व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे असे आवाहन संस्थेचे सदस्य संदीप सावंत, विनायक सापळे, सौ. प्रणाली सावंत, अभिजीत सावंत व मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.