
सिंधुदुर्ग : गेल्या महिन्यात भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या भाजपाच्या जंबो जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली. 4 सरचिटणीस,10 उपाध्यक्ष, 10 चिटणीस, एक कोषाध्यक्ष, एककार्यालयमंत्री, 60 कार्यकारिणी सदस्य यांसह विशेष निमंत्रित, निमंत्रित सदस्य अशी एकूण 150 जणांची कार्यकारिणी असल्याची माहिती प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शरद कृषी भवन येथे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य राजू राऊळ यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष सावंत यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख निलेश राणे, आ नितेश राणे, राजन तेली, मनोज रावराणे यांच्या सहकार्याने कार्यकारिणी रचना पूर्ण करण्यात आलेली असून भाजपाच्या घटनेप्रमाणे संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा प्रभारी महेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मान्यता यासाठी घेण्यात आलेली आहे, असे यावेळी सावंत यांनी सांगितले.