राजे प्रतिष्ठानकडून पुरस्कारांची घोषणा

Edited by:
Published on: October 07, 2024 15:02 PM
views 169  views

सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर चार(४) सावंतवाडी च्या शिक्षिका श्रीम.अंजना राजीव  घाडी व अन्वी अनंत धोंड यांची जिल्हास्तरीय  आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल कामगिरी बद्दल हा राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

त्याच बरोबर आदर्श विद्यार्थिनी हर्ष रवींद्रनाथ गोसावी व हिताली प्रसाद राणे  तर वेदा प्रविण राऊळ ( स्कॉलरशिप ). आराध्य रणजीत माने ( स्कॉलरशिप ).वीरा राजीव घाडी ( ए.पी.जे. अब्दुल कलाम ). यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनाही राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग तर्फे राज्यस्तरीय आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात येणार आहे.  १० ऑक्टोंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चार येथे सरस्वती पूजन व स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. 

अशी माहिती राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे. यावेळी सचिव रामचंद्र कुडाळकर, सहसचिव कल्याण कदम, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा महिला अध्यक्ष पूजा गावडे, तालुका अध्यक्ष संचिता गावडे, सावंतवाडी शहराध्यक्ष सेजल पेडणेकर, आदि उपस्थित होते.