गावराईतील साई मंदिरचा वर्धापन दिन

२८ पासून कार्यक्रमांची सुरुवात
Edited by:
Published on: April 25, 2025 15:52 PM
views 107  views

सिंधुदुर्गनगरी : गावराई - सुकळवाड येथील साई मंदिर चा १६वा वार्षिक वर्धापन २८ते ३० एप्रिल दरम्यान साई पालखी सोहळा सह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे तरी भाविक भक्तांनी या वर्धापन दिन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापकीय सल्लागार शेखर वालावलकर यांनी केले आहे

गावराई सुकळवाड येथील साई मंदिर चा वार्षिक सोळावा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा निमित्त २१ ते २८ एप्रिल दरम्यान साई चरित्र पोथी वाचन पारायण आणि विविध भजने सादर केली जात आहेत २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता साई चरित्र पारायण समाप्ती व त्यानंतर साई बाबांवर अभिषेक दुपारी १२ .३० वाजता आरती त्यानंतर ३ ते ६ .३० साई मंदिर महापुरुष हनुमान मंदिर वरचा नाका ब्राह्मण देव मंदिर ते साई मंदीर माऊली पाताळेश्वर ढोल पथक चेंदवण यांचे ढोल गजरात साईबाबांची भव्य दिव्य पालखी मिरवणूकसंपन्न होणार आहे त्यानंतर सायंकाळी ०० .७ ते ७ .३० दीपोत्सव महाआरती ०८ ते ९ ३०महिलांसाठी बहारदार  सूत्रसंचालक भावोजी उमेश परब कुडाळ यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्यानंतर खुले रेकॉर्ड डान्स कार्यक्रम २९ एप्रिल रोजी सकाळी ०८ वाजता साई अभिषेक ९ ते १२ रुद्राभिषेक हवन १२:३० आरती दुपारी तीन ते सहा नामस्मरण सायंकाळी ७ वा दीपोत्सव महाआरती ७ ३० वाजता गांगेश्वर वारकरी भजन मंडळ किर्लोस यांची वारकरी दिंडी भजनरात्रौ ०८ वाजतावालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा प्रचंड भैरव हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे बुधवार दिनांक ३०एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ .३० आरोग्य शिबिरसकाळी १० ते १२ .३० वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १ ते ३ महाप्रसाददुपारी २.३० ते ६.३०नामस्मरणसायंकाळी ७ ते ७.१५दीपोत्सव महाआरती ७३० ते ०८साई दिंडी  ०८ ते ११ .३०दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा वज्रेश्वरी महिमा हा महान पौराणिक नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे तरी साई भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.