खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनचा 20 - 21 मार्चला वर्धापनदिन !

Edited by: दिपेश परब
Published on: March 07, 2024 09:47 AM
views 163  views

वेंगुर्ले :  खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या पुण्यभूमीवर ३० वा देवता स्थापना दिन (वर्धापन दिन) २० मार्च आमलकी एकादशी ते गुरुवार २१ मार्च व्दादशी दिन या दोन दिवशी होत आहे.

   यानिमित्त २० रोजी सकाळी ७ वाजता नित्यपूजा, सकाळी ९ वाजता आवळी वृक्षपूजन, दुपारी १.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ६.३० वाजता धुपारती, पालखी प्रदक्षिणा, सायंकाळी ७ वाजता श्री दत्तमाऊली दशावतार लोककला सिंधुदुर्ग आयोजित 'वीर चक्राचा पण' हा नाट्यप्रयोग होणार आहे.

२१ रोजी बालकनाथ नाट्यप्रयोग

 गुरुवार २१ मार्चला सकाळी ७ वाजता नित्यपूजा, सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, पालखी प्रदक्षिणा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ७ वाजता नाट्यमंडळ, ओमकार दशावतार म्हापण यांचा 'बालकनाथ' नाट्यप्रयोग असे कार्यक्रम निश्चित आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांनी केले आहे.