
सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिरास १७३ वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून वाचन मंदिर आणि स्व. दीपक नेवगी कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन समारंभाच आयोजन शुक्रवार दि. १८ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलं आहे. सायंकाळी ६.०० वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. कै. अॅड. दीपक दत्ताराम नेवगी माजी अध्यक्ष, श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी स्मृती पुरस्कार श्री. विश्वनाथ मंगेश उर्फ भाऊ नाईक, ज्येष्ठ कीर्तनकार यांना देण्यात येत आहे.
या निमित्ताने एका विशेष कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष कार्यकारी अधिकारी शहाजान ए. शेख असणार असून या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती अॅड. संदीप निंबाळकर कार्याध्यक्ष, प्रसाद पावसकर अध्यक्ष, रमेश बोंद्रे कार्यवाह श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांनी केली आहे.