शिरंगेतील श्री सातेरी देवीचा वर्धापन दिन सोहळा

Edited by: लवू परब
Published on: May 08, 2025 16:11 PM
views 28  views

दोडामार्ग : शिरंगे येथील श्री सातेरी देवीचा 18 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि ०९ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

यानिमित्त सकाळी देवतांचे शुद्धीकरण व पंचोपचार पूजा अभिषेक सोहळा, तसेच सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद महाप्रसाद होणार आहे.  रात्री 9 वाजता ओम वीरभद्र दशावतार  नाट्य मंडळ भांडुप मुंबई यांचा महान नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून देवाचा आशीर्वाद व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीरंगे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.