
कणकवली : नरडवे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अंकुश रामचंद्र सावंत (बाळा गुरूजी) यांची सलग चौथ्या वेळी बिनविरोध निवड झाली आहे. सचिवपदी गुरुनाथ साटम यांनी नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड झाली.
अंकुश सावंत हे अनेक वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. शैक्षणिक उपक्रमांमध्येही ते सक्रिय असतात. गावातील तंटे स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत असून या पुढेही असेच काम करू, असे मनोगत अंकुश सावंत यांनी व्यक्त केले. ग्रामसभेत सरपंच गणपत सावंत, उपसरपंच विनोद बागवे, सर्व ग्रा. पं. सदस्य, तंटामुक्त समितीचे सचिव संदेश साटम व सर्व पोलीस पाटील, बहुसंख्य ग्रामस्थ , महिला भगिनी, तलाठी अजय भांडेकर, ग्रामसेवक यशवंत तांबे आदी उपस्थित होते.