
कणकवली : कणकवली तालुक्यातील ‘अंकुरम’ या पूर्व प्राथमिक शाळेला नुकतेच प्री–प्रायमरी स्कूल ऍक्रीडेशन कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षक प्रशिक्षण, भौतिक सुविधांची उपलब्धता, विद्यार्थी सुरक्षा, अध्यापन पद्धती अशा विविध निकषांच्या मूल्यांकनानंतर हे मानांकन देण्यात आले आहे. या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद, भारत या संस्थेच्या तालुका विस्तार अधिकारी रूपाली कदम, महिला सल्लागार शांती सावंत, अंकुरम स्कूल संचालिका गायत्री देवळी, पालक प्रतिनिधी प्रा. दिवाकर मुरकर, सहशिक्षका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.