खांबाळे विठ्ठल रखुमाई मंदिरात अंखड हरिनाम सप्ताहाचं आयोजन

Edited by:
Published on: April 04, 2025 19:34 PM
views 30  views

वैभववाडी : खांबाळे साळुंखेवाडी येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात ३७ व्या अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते १२ एप्रिल या कालावधीत हा सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने राज्यभरातील नामवंत किर्तनकारांची किर्तने आणि प्रवचन ऐकण्याची संधी भाविकांना उपलब्ध होणार आहे.

येथील श्री देव विठ्ठल रखुमाई भक्ती सेवा मंडळ साळुंखेवाडी यांच्यावतीने गेली ३६ वर्षे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. याहीवर्षी ६ ते १२ एप्रिल या कालावधीत हा सप्ताह होत आहे. या निमित्ताने दरदिवशी पहाटे ते ७ प्रातस्मरण काकडआरती,८ ते १२ आणि सायकांळी ३ ते ५ श्री. ज्ञानेश्वरीचे सामुदायकि पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,सायकांळी -७ ते ७.३० संध्या,रात्रौ-९ ते ११ किर्तन असे कार्यक्रम होणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरातील किर्तनकारांची किर्तन होणार आहेत.यामध्ये ह.भ.प मुकुंद महाराज पाटेकर-मुंबई, ह.भ.प कृष्णांत महाराज कुंभार-कोल्हापुर, ह.भ.प संतोष महाराज राठोड-मुंबई, ह.भ.प श्रीराम महाराज पांचाळ –राजापुर, ह.भ.प शंकर महाराज मोरे-वाई सातारा, ह.भ.प ज्ञानेश्वरी पौळ-संभाजीनगर, (वय-७ वर्ष) ह.भ.प आशाताई हनमघर-पुणे, ह.भ.प भक्तीयोगी कृष्णानंद महाराज साळुंखे यांचा समावेश आहे.

१२ एप्रिला या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्री.ज्ञानेश्वर महाराजाच्या ग्रंथ दिंडीने होणार आहे.या कार्यक्रमाला वारकरी साप्रदांय आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री.देव विठ्ठल रखुमाई भक्ती सेवा मंडळ साळुंखेवाडी यांनी केले आहे.