मंत्री नितेश राणेंना अनिस नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

प्रभू श्रीरामाची प्रतिमा भेट देऊन केलं अभिष्टचिंतन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 22, 2025 20:56 PM
views 193  views

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री यांच्या वाढदिवसाच्या पुर्व संध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शासकीय ठेकेदार अनिस नाईक मुंबई येथे अधिश बंगल्यावर जाऊन शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त श्री प्रभु श्रीरामाची प्रतिमा भेट दिली.

मंत्री नितेश राणेंचा उद्या २३जून ला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला मुंबईत राज्यभरातून अनेक नेते, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शासकीय ठेकेदार अनिस नाईक यांनी देखील आज सायंकाळी मंत्री राणे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ व श्रीरामाची प्रतिमा भेट देऊन दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.