अनिसचं जादूटोणा विरोधी कायद्यावर मार्गदशन...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 22, 2023 20:34 PM
views 314  views

देवगड : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सिंधुदुर्गतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिका सह व्याख्यान झाले.

महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध करणारा कायदा म्हणजेच जादूटोणा विरोधी कायदा समंत केला.मात्र,त्याचा म्हणावा तसा प्रसार व प्रचार न झाल्या मुळे,अ.भा अनिस चे संस्थापक प्रा.श्याम मानव यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर या कायद्याची जनजागृती करण्यात येत आहे.जादूटोणाविरोधी कार्याअंतर्गत येणाऱ्या बारा कलमांचे मार्गदर्शन व त्यावर आधारित छोटे छोटे प्रयोग प्रात्यक्षिकांचे आयोजन अंनिसचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर,जिल्हा संघटक समीर साळकर यांनी केले होते. त्या साठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यासाठी कोषाध्यक्ष अनिल चव्हाण व सरचिटणीस विजय चौकेकर यांनी महात्मा गांधी विध्यामंदिर, तळेबाजार या ठिकाणी जादूटोना विरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित केले होते.

कोणत्याही बुवा व बाबाच्या नादी न लागता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आपण समाजात वावरत असताना या भोंदूबाबांन कडे न जाता आपण एक आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबणे गरजेचे आहे. या वेळी महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदया विषयी विध्यार्थ्यां मध्ये माहिती देण्यात आली.

या जादू टोण्या विषयी काही ढोंगी व पाखंडी बुवा व बाबांच्या नादी लागून काहींनी आपली कशी मुले गमावलीत तर काही या बाबांच्या नादी लागून भूत बादेचा समज करून घेत आपल्या कुटुंबातील स्त्रीयांना या अश्या ढोंगी बाबाच्या स्वाधीन करून आपल्या परिवारातील त्रियांना गमावले,असे हे प्रकार आपण या पुढे रोखू शकतो.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या विरोधात काम करत आहे. आमचा कोणत्याही देवतेला आमचा विरोध नसून या समाजातील अंधश्रद्धे चे अवास्तव अवडंबर माजवले जाते त्या गोष्टीचा स्तोम माजऊन काही ढोंगी बाबांच्या नादी लागून काही कुटूंब उद्ववस्थ झाली आहेत.या गोष्टीना वेळीच आळा बसून आमची संस्था हि समाज प्रबोधनाचे काम करीत आहे.असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा सिंधुदुर्ग वतीने मार्गदर्शन कार्यक्रमात शाळेतील विदयार्थी,शिक्षक,यांना सँबोधित करून प्रबोधन करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर उपस्थित मा.प.समिती सदस्य अजित कांबळे हे हि या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे मध्ये नवीन सहभागी झाले व त्यांनी हि या वेळी मार्गदर्शन करून आपले मत मांडले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हि या ठिकाणी मोफत प्रात्यक्षिक दाखवून समाज प्रबोधनाचे काम करत असते,

शासकीय कोणताही निधी न घेता मोफत जनजागृतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम,या कर्यक्रमाद्वारे विविध प्रयोग करून सिंधुदुर्ग जिह्यामधील अगदी गावा गाव मध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर माजलेली आहे.आणि हि अंधश्रद्धा दूर होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली बरीच वर्षे विजय चौकेकर व त्यांची टीम काम करत आहे.व हि संस्था शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी किंवा मानधन न घेता मोफत हे जनजागृतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम करत असते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध प्रयोग करून प्रात्यक्षिके दाखवून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयन्त करण्यात येतो.मा.पं.स.सदस्य अजित कांबळे हे यांच्या याच कार्यावर प्रभावित होऊन छोटासा आपल्या हातून देखील सामाजिक कार्य व्हावे या उद्धेशाने या संस्थे मध्ये नवीनच सहभागी झाले .व आपल्या देवगड तालुक्यातील जनतेला एका चांगल्या मार्गावर घेऊन येण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करून जी लोक अंधश्रद्धे च्या आहारी जाऊन आपले करोडो रुपये गमावतात त्यांचे संसार वाऱ्यावर सोडतात अशा लोकांना या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी हे कार्य मोलाचे आहे. या भारत भूमीतील साधू संतानी असे समाज प्रबोधनाचे कार्य करून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून श्रद्धेकडे लोकांना वळविले तशा प्रकारचा हा छोटासा प्रयन्त माझ्या कडून या समितीच्या माध्यमातून चाललेला आहे.व तळेबाजार हायस्कुल मध्ये हा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व आजच्या या दिवसापासून या समितीच्या कार्या मध्ये आपण वाहून घेऊन काम करण्याचे अजित कांबळे यांनी यावेळी प्रतिपादन केले.या वेळी व्यासपीठावर मा.प.समिती सदस्य अजित कांबळे,शाळेचे मुख्याध्यापक नंदन घोगळे सर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर,कोषाध्यक्ष अनिल चव्हाण,चंद्रशेखर चौकेकर,खजिनदार संतोष वरेरकर,

तसेच या वेळी शिक्षक,विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित विध्यार्थ्यांन कडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.गावा गावात शाळा,कॉलेज मध्ये असे प्रबोधनात्मक प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क साधण्याच आवाहन जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर(९४२०९७४७७५)व मा.प.समिती सदस्य अजित कांबळे यांच्या कडून करण्यात आले.