पशू वंध्यत्व निवारण शिबिर !

आंदुर्ले ग्रा.पं. व पशुवैद्यकीय दवाखाना तेंडोलीच आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: December 18, 2023 12:55 PM
views 141  views

कुडाळ : पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान सुरू आहे. याच अनुषंगाने शनिवारी आंदुर्ले सोसायटी  येथे आंदुर्ले ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय दवाखाना तेंडोली यांच्या संयुक्त विद्यमाने गाई-म्हैशींमधील वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 या शिबिरामध्ये आंदुर्ले ग्रामपंचायतच्या माध्यमातून लिक्वीड कॅल्शियम उपलब्ध करण्यात आले. त्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. आंदुर्ले गावातील ज्या शेतकऱ्यांच्या गाई-म्हैशी आहेत अशा शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य आरती पाटील, प्रसाद सर्वेकर, सतिश राऊळ, आंदुर्ले सोसायटी वाईस चेअरमन दिगंबर मयेकर, दुध उत्पादक संस्था उपाध्यक्ष महेश राऊळ हे उपस्थित होते.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुधाकर ठाकूर व पशुसंवर्धन अधिकारी कुडाळ डॉ.दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तेंडोली पशुवैद्यकीय दवाखानाचे डॉ.संजय चव्हाण, डॉ.खवणेकर, डॉ.परब यांनी हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.