
सिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्वर | सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले किशोर तावडे यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर तावडे यांची मॅनेजिंग डायरेक्टर फार्मिंग कॉर्पोरेशन पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर मुंबई येथील हापकिन बायोफार्माचे मॅनेजिंग डायरेक्टर असलेले अनिल पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.